कोल्हापूर : कोणाला काय उत्तर द्यायचे, याचे अधिकार आमच्या नेत्यांना आहेत. नारायण राणे हे शरद पवारांना काय म्हणाले, ते पाहावे लागेल. मात्र आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे समर्थन केले. तसेच आमच्या पार्टीतील नेत्यांना इतरांनी टीका केल्यास त्याला उत्तर देण्याचे अधिकार असल्याचे पाटील यांनी कोल्हापूर येथे बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, असे पाटील म्हणाले. शरद पवार आणि नारायण राणे काय म्हणाले मला माहित नाही. पण शरद पवार आणि संजय राऊत यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा जास्त आहे, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठीण होईल : राणे
दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या बंडखोरीच्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ असून या घटनांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ज्या काही घडामोडी आहेत, त्या टिव्हीवरच पाहायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.