नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भारत-एनसीएपी प्रोग्राम लॉन्च करण्याच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली आहे. तसे त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिला आहे. आता देशात लाँच होणाऱ्या गाड्यांना सुरक्षा तपासण्यासाठी परदेशात जावे लागणार नाही, तर भारतात आपल्या कार किती सुरक्षित आहेत, याची क्रॅश टेस्ट करता येणार आहे. क्रॅश टेस्टमध्ये त्यांच्या प्रदर्शनानुसार सेफ्टी रेटिंग दिली जाणार आहे.
Star Rating of Indian Cars based on Crash Tests is extremely crucial not only to ensure structural and passenger safety in cars, but to also increase the export-worthiness of Indian automobiles.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 24, 2022
आता भारताची स्वतःची सुरक्षा एजन्सी असेल, या बातम्यांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या भारतात तयारी होणारी वाहने क्रॅश टेस्टसाठी परदेशात म्हणजेच ग्लोबल एनसीएपीकडे पाठवली जातात. मात्र आता या क्रॅश टेस्ट भारतातच होतील. ग्लोबल क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल प्रमाणेच भारतातही वाहनांचे टेस्टिंग होईल. गडकरी म्हणाले की, भारताला जगातील नंबर १ ऑटोमोबाइल हब बनवण्याच्या मिशनसह आपले काम सुरु आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल उद्योगाला आत्मानिर्भर बनवण्यासाठी भारत-एनसीएपी हे एक महत्त्वाचे साधन ठरेल.