Sunday, April 27, 2025
Homeताज्या घडामोडीअनिल परब ईडीच्या जाळ्यात?

अनिल परब ईडीच्या जाळ्यात?

सलग चौथ्या दिवशी अनिल परबांची ईडी चौकशी

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब गेले तीन दिवस ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. आज सलग चौथ्या दिवशी अनिल परबांची ईडी चौकशी होत असून परब यांच्यावर ईडीकडून अटकेची टांगती तलवार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात परबांची ही चौकशी सुरु आहे.

ईडीने मंगळवारी तब्बल ११ तास, बुधवारी जवळपास आठ तास, तर गुरुवारी सहा तास अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.

ईडीने अनिल परब यांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितले होते. अनिल परब यांना ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यानं ते चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापे मारले होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत.

पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -