अखेर ठरले! शिंदे गटाला भाजपची ऑफर

Share

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून ते आपल्या गटातील आमदारांना संबोधित करताना दिसत आहेत. यात त्यांनी आपण भाजपसोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचे नाव न घेता एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा असून हा राष्ट्रीय पक्ष आपल्याला काही कमी पडू देणार नाही, असे बोलताना ते या व्हिडीओ मध्ये दिसत आहेत. कुठेही काही लागले तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहायचे आहे. आपले सुख, दु:ख सारखेच आहे. विजय आपलाच आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सत्तेचा सस्पेन्स वाढत असून एकनाथ शिंदे यांनी ४१ आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. बंडखोर आमदारांनी त्यांचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केलेली आहे. ते उद्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. शिवसेनेचे ४१ आणि ६ अपक्ष अशा सर्व ४७ सह्यांचे पत्र ते पाठवणार आहेत.

एकनाथ शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर असल्याची चर्चा आहे. राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदं आणि ५ राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदेनाही केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर राज्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असू शकतात. संजय राठोड, दादा भुसे यांच्यासारख्या शिवसेनेच्या गटातील व्यक्तींची महामंडळांवरही वर्णी लागण्याची शक्यता आहे.

४१ आमदार, ९ अपक्ष आणि १२ खासदार!

आमदारांच्या बंडखोरीची चर्चा असतानाच आता बारा खासदारही शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे १८ खासदार असून १२ खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार असतील तर हा ठाकरेंसाठी हा आणखी मोठा धक्का असेल. त्यामुळे आता ठाकरे पुढे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३७ आमदार, ९ अपक्षांचा पाठिंबा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आमदार असून त्यांना ९ अपक्षांचा पाठिंबा आहे. शिंदे गटाने गुवाहाटीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून एकूण ४६ आमदारांचे संख्याबळ शिंदेंकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील यादी देखील शिंदे गटाकडून जारी करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या असून शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांच्याकडे सर्व आमदारांच्या सह्या असलेले पत्र पाठवले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे शिवसेनेचे आमदार

1) एकनाथ शिंदे 2) अनिल बाबर 3) शंभूराजे देसाई 4) महेश शिंदे 5) शहाजी पाटील 6) महेंद्र थोरवे 7) भरतशेठ गोगावले 8) महेंद्र दळवी 9) प्रकाश अबिटकर 10) डॉ. बालाजी किणीकर 11) ज्ञानराज चौगुले 12) प्रा. रमेश बोरनारे 13) तानाजी सावंत 14) संदीपान भुमरे 15) अब्दुल सत्तार नबी 16) प्रकाश सुर्वे 17) बालाजी कल्याणकर18) संजय शिरसाट 19) प्रदीप जयस्वाल20) संजय रायमुलकर 21) संजय गायकवाड 22) विश्वनाथ भोईर 23) शांताराम मोरे 24) श्रीनिवास वनगा 25) किशोरअप्पा पाटील 26) सुहास कांदे 27) चिमणआबा पाटील 28 लता सोनावणे 29) प्रताप सरनाईक 30) यामिनी जाधव 31) योगेश कदम 32) गुलाबराव पाटील 33) मंगेश कुडाळकर 34) सदा सरवणकर 35) दीपक केसरकर 36) दादा भुसे

एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे अपक्ष आमदार

1) बच्चू कडू 2) राजकुमार पटेल 3) राजेंद्र यड्रावकर 4) चंद्रकांत पाटील 5) नरेंद्र भोंडेकर 6) किशोर जोरगेवार 7) मंजुळा गावित 8) विनोद अग्रवाल 9) गीता जैन

Recent Posts

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…

13 minutes ago

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…

25 minutes ago

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

55 minutes ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

56 minutes ago

Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…

1 hour ago

Ram Charan: अभिनेत्याच्या जिद्दीला सलाम! केलं कठोर व्रत आणि अखेर चित्रपटाला मिळालं ऑस्कर!

मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…

1 hour ago