मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आजही भाजपचे काही नेते पोहोचले आहेत. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर फडणवीस तातडीने दिल्लीला गेले होते. पक्षश्रेष्ठींची चर्चा करून ते महाराष्ट्रात परतले. आता आशिष शेलार, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय, नितेश राणे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकर सध्या फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर असल्याची चर्चा आहे. राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदं आणि ५ राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदेनाही केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर राज्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असू शकतात.
संजय राठोड, दादा भुसे यांच्यासारख्या शिवसेनेच्या गटातील व्यक्तींची महामंडळांवरही वर्णी लागण्याची शक्यता आहे.
४१ आमदार, ७ अपक्ष आणि १२ खासदार!
आमदारांच्या बंडखोरीची चर्चा असतानाच आता बारा खासदारही शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे १८ खासदार असून १२ खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार असतील तर हा ठाकरेंसाठी हा आणखी मोठा धक्का असेल. त्यामुळे आता ठाकरे पुढे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.