Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक असे काही नाही - उदयनराजे

महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक असे काही नाही – उदयनराजे

नवी दिल्ली : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही? यावरुन सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असे काही वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गेल्या दोन वर्षांपासून ही खदखद चालूच होती. मुळात आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्यावेळेस एका विचाराने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कुठल्या ताकदीची, आमिष दाखवण्याची गरज नाही. पण ज्यावेळी लोक सत्ता स्थापन करण्यासाठी जातात, वेगवेगळ्या विचारांचे लोक, पक्ष जेव्हा एकत्र येतात, केवळ त्यांचे उद्दिष्ट काय असते.. सत्ता स्थापन करण हे असते. सत्ता स्थापन त्यांनी केली. विचारसरणी वेगळी असल्यामुळे या लोकांना एकत्र ठेवणे तारेवरची कसरत करावी लागली, असे उदयनराजे भोसले म्हणाले. ती वेगवेगळ्या विचाराचे असल्यामुळे फार काळ एकत्र राहत नाही आणि त्यातूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

खरेतर हे लोक ज्यावेळेस एकत्र आले होते. त्यावेळेस विचार करायला हवा होता, की हे किती दिवस टिकणार? लोक आज बोलवून दाखवतात लोकांना पक्षश्रेष्ठींकडून वेळ दिला जात नाही. त्याच बरोबर तुमची कामं होत नाही. मग असे होत असताना आज आमदार, खासदारकीचा पाच वर्षांचा कालावधी असतो. स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचा कालावधी संपला आहे. या दोन-चार महिन्यात सर्वांना सामोरे जावे लागेल. मग अशा वेळेस विचार केल्यास शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मतदारसंघातील विरोधक राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. त्यामुळे ही समीकरणे जुळवली गेली आहेत, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -