मुंबई : सध्या महाराष्ट्रात राजकीय भूकंप निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हिंदुत्व आमच्यासाठी महत्वाचे आहे. माझ्यासोबत असलेले आमदार हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंदुत्वाशी तडजोड कधीच करणार नाही. आमच्यासोबत ४६ आमदार आहेत. या शिवसेनेसह इतरही आमदार आहेत. हा आकडा अजून वाढणार आहे. आमच्या कुठल्याही अटी नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. आमची सर्व आमदारांची संध्याकाळी बैठक होणार आहे, त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक संख्याबळ आहे.