Monday, July 15, 2024
Homeअध्यात्मआनंद घेण्याची कला?

आनंद घेण्याची कला?

हिंदू संस्कृतीने सर्व ठिकाणी देव भरलेला आहे, असे म्हटले तरी आपण ही संकल्पना नीट समजून घ्यायला हवी. सर्वांमध्ये देव भरलेला आहे म्हणजे देवांत आपण भरलेले आहोत. मी एक उदाहरण देतो. कळत पाणी आहे की, पाण्यांत कळ आहे, असा प्रश्न विचारला, तर काय उत्तर द्याल? कळत पाणी आले कुठून? पाण्यात कळ आहे म्हणून कळत पाणी आले, तसे तुम्ही आम्ही सर्व त्या विश्वंभराच्या, जगदीशाच्या अंगाखांद्यावर खेळतो, बसतो, उठतो पण आपण त्याबद्दल अनभिज्ञ आहोत. तो आतमध्ये जाणीवरूपाने आहे, आनंदरूपाने आहे. हे सर्व आपल्याला अनुभवाला येते का? आनंदासाठी आपण धडपड करतो. तू आनंदातच वास्तव्य करून आहेस आणि तू आनंद घ्यायला लागलास, तर तो तुला कसा सापडेल? जगांत दुःख का? जे आपल्यातच आहे ते तू धू लागलास, तर तुला ते मिळेल कसे? लोकांना कळत नाही, सांगितले, तर पटत नाही. विश्वास पण ठेवत नाहीत. आज सगळे लोक सुखासाठी धडपडतात, आनंदासाठी धडपडतात. भरपूर पैसा पाहिजे असतो, पण पैसे सुख मिळाले असते, तर सगळे पैसेवाले सुखी झाले असते. जेवढा पैसा अधिक तेवढी भिती अधिक. चोरापासून भिती, दरोडेखोरापासून भिती म्हणजेच जेवढा पैसा जास्त तेवढी भिती अधिक. पैशाला सांभाळण्यासाठी व्यवस्था करावी लागते. भिती याला सोडत नाही. भितीमुळे याला झोप येत नाही. ज्याच्याकडे पैसा कमी ते लोक सुखाने झोपतात, पण ज्याच्याकडे पैसा भरपूर ते सुखाने जेवतही नाहीत व झोपतही नाहीत. comforts of life मिळण्यासाठी पैसा पाहिजे. पण त्याची मर्यादा ओळखलेली बरी. जीवनविद्या सांगते शहाणपणाला पर्याय नाही. शहाणपण हे ज्ञानातून निर्माण होते. ज्ञान हे सुखाला कारणीभूत ठरते, तर अज्ञान हे माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरते. २९चा पाढा आपण लहानपणी पाठ केलेला आहे. पण आता तो आपल्याला म्हणता येणार नाही, कारण आपण तो विसरलो. काही लोक म्हणतील सुद्धा पण बहुतेक लोक विसरले. २९चा पाढा, पावकी, अडीचकी, पाऊणकी ह्या गोष्टी लहानपणी पाठ केलेल्या आहेत, पण आता ते म्हणता येणार नाहीत. सांगायचा मुद्दा, २९चा पाढा पूर्वी चांगला पाठ होता, स्मरणात होता पण आता तो विसरलो. स्मरणात होते ते विस्मरणात जाते. मुळात परमेश्वर स्मरणातच नसेल, तर विस्मरणात कुठून येणार?

– सदगुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -