Saturday, July 5, 2025

शिवसेनेचे बंडखोर आमदार कडक बंदोबस्तात

शिवसेनेचे बंडखोर आमदार कडक बंदोबस्तात

गुवाहाटी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांसह विशेष विमानाने बुधवारी पहाटे सूरतहून गुवाहाटीला दाखल झाले. याठिकाणी रॅडीसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असून पहाटेपासून हॉटेलच्या भोवती कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिंदे यांच्याकडे सुमारे ४५ आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.


एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष असे एकूण ४५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. तर, आपल्याला ४६ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.


दरम्यान, हॉटेलच्या भोवती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून याठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा