Monday, May 12, 2025

क्रीडा

सविता पुनियाकडे महिला हॉकी संघाची कमान

सविता पुनियाकडे महिला हॉकी संघाची कमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर दीप ग्रेस एक्काला उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


महिला हॉकी विश्वचषक १ ते १७ जुलै दरम्यान नेदरलँड आणि स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहे. माजी कर्णधार राणी रामपाल पायाच्या स्नायूंच्या दुखापतीतून सावरल्यानंतर बेल्जियम आणि नेदरलँड्सविरुद्धच्या एफआयएच प्रो लीग सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला.


संघाचा भाग असूनही, राणी प्रो लीगच्या युरोपियन लेग दरम्यान पहिल्या चार सामन्यांमध्ये खेळली नाही. यामुळे ती अनफिट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हॉकी इंडियाने तिच्या फिटनेसची स्थिती स्पष्ट केलेली नाही.



गोलरक्षक : सविता पुनिया (कर्णधार), बिचू देवी खरीबम;


बचावपटू : दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता;


मिडफिल्डर : निशा, सुशीला चानू, पुखरंबम, मोनिका, नेहा, ज्योती, नवज्योत कौर, सोनिका, सलीमा टेटे;


फॉरवर्ड : वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी;


पर्यायी खेळाडू : अक्षता आबासो ढाकले, संगीता कुमारी या खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment