
मुंबई : शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचल्याचा आनंद शिवसेना खासदार संजय राऊत यांना झाला, असे खोचक ट्विट भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे.
संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने, असे राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/MeNarayanRane/status/1539509722360840193तर दुसरीकडे, मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आदरणीय पवार साहेब यांचं स्वप्न पूर्ण... शिवसेना संपली...? असे म्हटले आहे.
https://twitter.com/GajananKaleMNS/status/1539474596352692226दोघांचे ट्विट पाहता राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मविआ सरकार बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यातील घडामोडींना वेग आला आहे.
https://twitter.com/GajananKaleMNS/status/1539439591093960704यापूर्वीही भाजपच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे. असे वक्तव्य केलं होतं.