
राऊतांच्या ट्विटनंतर नितेश राणेंचे ट्विट
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत मविआ सरकार बरखास्त होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावर, भाजप आमदार नितेश राणे यांनी चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, असे ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार! असे असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1539496681346985984