मुंबई : मोहित कंबोज आमदारांसह गुवाहाटी येथे पोहोचले असल्याचे समोर येत आहे. मोहित कंबोज, संजय कुटे आणि रविंद्र चव्हाण हे तिघेही सध्या गुवाहाटीमध्ये असून सूरतमध्येही आमदारांना ठेवण्यापासून गुवाहाटीला नेईपर्यंत सर्व जबाबदारी त्यांच्याकडेच होती. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी एक खोचक ट्वीट केले आहे.
विधायक अगवा नहीं हुए, भगवा हुए है !
जय श्री राम
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 22, 2022
“विधायक अगवा नहीं हुए, भगवा हुए है! जय श्री राम,” असे ट्वीट मोहित कंबोज यांनी केले आहे. तर दुसऱ्या ट्वीट मध्ये त्यांनी हर हर महादेव असे म्हटले आहे. यापूर्वीही मोहित कंबोज हे आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली होती.