
कणकवली : एकीकडे स्वपक्षातूनच अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे. पक्ष चालवणे उद्धव ठाकरेंचे काम नाही. 'मातोश्री ११ आयपीएल टीम' बनवा, असे ट्विट त्यांनी केले आहे.
निलेश राणे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “शिवसेनेचे ११/१२ आमदार शिवसेनेसोबत राहतील अशी परिस्थिती आहे. पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे ११/१२ घेऊन आयपीएल टीम साठी तयारी करा… मातोश्री ११ बनवा.” सध्या स्वपक्षांतील बंडखोरीमुळे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा जोरदार टोला मानला जात आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1539513182913368064
जवळपास ८० टक्के आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याने सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना हा टोला जोरदार प्रहार करणारा आहे.