ठाणे : आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट केली होते. यामुळे तिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. तिच्या या वक्तव्याच्या सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात आला होता.
आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर केतकीला १४ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर १८ मे पासून केतकी न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएम पटवर्धन यांनी सुनावणी केली.
बुधवारी केतकीच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. यापूर्वीही तिला ठाणे सत्र न्यायालयानं अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता. तिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने अटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘मला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे,’ असा दावा केतकीने याचिकेद्वारे केला होता.