Thursday, July 18, 2024
Homeमहामुंबईमुंबईकरांना आपत्तीची माहिती देणारे अॅप सेवेत

मुंबईकरांना आपत्तीची माहिती देणारे अॅप सेवेत

नातेवाइकांचे, मित्रांचे मोबाइल क्रमांक जतन करण्याची सुविधा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट बीएमसी’ हे अॅप्लीकेशन मंगळवारपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. मुंबईकर हे अॅप प्ले स्टोरमधून डाउनलोड करून वापरू शकतात.

दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती उद्भवते. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून डाउनलोड करून मुंबईकर हे अॅप वापरू शकणार आहेत. मुंबईकरांना आपत्तीची माहिती देण्यासोबत संकटात सापडलेल्या नागरिकाची माहिती एका क्लिकवर त्याच्या नातेवाईकांना समजणार असल्याने मुंबईकरांसाठी हे अॅप उपयोगी ठरणार आहे.

या अॅपमध्ये जवळच्या नातेवाईकांचे, मित्रांचे मोबाईल क्रमांक जतन करण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे मुंबईतील पावसाळी परिस्थितीची माहिती देखील या अॅपवर उपलब्ध असेल. त्यामुळे मुंबईतील पावसाचा १५ मिनिटांचा, दर तासाचा तसेच २४ तासांचा अद्ययावत अहवाल उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या अॅपच्या माध्यमातून विविध भागात पडलेल्या पावसाची माहिती देखील तत्काळ व सहजपणे जाणून घेता येणार आहे.

अॅप कसे चालणार?

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्धभवल्यानंतर या ॲपवर असणाऱ्या एसओएस सुविधेचा वापर करण्यासाठी त्याला एक क्लिक करायचा आहे. त्यानंतर लगेच ॲपवर जतन असलेल्या मोबाइल क्रमांकावर आपल्या भौगोलिक स्थानाच्या माहितीसह लगेचच लघुसंदेश जाणार आहेत. यामुळे संबंधित व्यक्तीला लगेच मदत मिळू शकणार आहे.

ॲपमध्ये असणाऱ्या ‘इमर्जन्सी बटनावर क्लिक केले असल्यास संकटात सापडलेला नागरिक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या ५०० मिटर परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पोलीस ठाणे तसेच महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक उपलब्ध होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -