मुंबई : बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असे पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आले आहे. आमदारांप्रमाणे शिवसेनेने खासदारांचीही बैठक बोलवली होती. या बैठकीला चार खासदार अनुपस्थित होते.
वर्षा निवासस्थानावर बुधवारी दुपारी शिवसेना खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चार खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामध्ये भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित आणि श्रीकांत शिंदे अनुपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर श्रीकांत शिंदे बैठकीला अनुपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण यामध्ये आता आणखी तीन खासदारांची भर पडली आहे.