Thursday, July 3, 2025

सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही

सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही

सुरत : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास २० तासानंतर पहिली प्रतिक्रिया ट्विट द्वारे व्यक्त केली आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे शिंदे यांनी म्हटले.


https://twitter.com/mieknathshinde/status/1539171911044718593

दरम्यान, शिवसेनेने मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवले आहे.

Comments
Add Comment