Saturday, October 5, 2024
Homeक्रीडाकणकवलीत उद्यापासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

कणकवलीत उद्यापासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

३५० ते ४०० खेळाडू सहभागी

सिंधुदुर्ग (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनची संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेच्यावतीने कणकवलीत राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ ते २८ जून या कालावधीत कणकवलीत चौंडेश्वरी मैदानात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेच्यावतीने प्रत्येक तालुक्यात नवीन शाखा सुरू करून शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंगची प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेचे सचिव डॉ.राजाराम दळवी यांनी दिली आहे.

कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा बाँक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव डॉ. राजाराम दळवी, खजिनदार कृष्णा मातेफोड, सदस्य संतोष गुराम, सल्लागार विजय घरत, महाराष्ट्र बाँक्सिंग संघटना खजिनदार एकनाथ चव्हाण, रुपेश दळवी, सर्वेश दळवी, महाराष्ट्र रेफरी समिती चेअरमन तांत्रिक अधिकारी राजन जोथाडी, राज्य उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, व अन्य मान्यवर उपस्थित होते

डॉ.राजाराम दळवी म्हणाले, या स्पर्धेचे उद्घाटन २२ जून रोजी सकाळी १२ वा. आ. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत व अन्य उपस्थित राहणार आहेत.

ही बॉक्सिंग स्पर्धा महाराष्ट्र बाँक्सिंग संघटनेशी सलग्न असलेली नोंदणीकृत जिल्हा संघटना आहे. या संस्थेची नोंदणी १९९८ मध्ये झाली आहे. जिल्ह्यात बॉक्सिंग प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून सध्या मालवण तालुक्यात देवबाग व आंबोली येथे प्रशिक्षण सुरू आहे. जिल्ह्यातील तरुणांना बॉक्सिंग क्षेत्रामध्ये संधी मिळावी या उद्देशाने केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील विविध जिल्हे आणि शहरी भागातील ३५० ते ४०० खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी १७ ते १८ वयोगटातील स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य असोसिएशनतर्फे ही १८ वी युवा महिला स्पर्धा २२ ते २४ जून या कालावधीत होणार असून ८० वी पुरुष गटातील स्पर्धा ही २८ जून पर्यंत होणार आहेत.

जिल्ह्यातील क्रीडापटूंना किंवा बॉक्सिंग क्षेत्रामध्ये जाणाऱ्या तरुणांना ही स्पर्धा पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी महाराष्ट्र संघटनेची संलग्न असलेले पंच यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेची सर्व व्यवस्था जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे बॉक्सिंग क्षेत्रांमध्ये आजवर जिल्ह्यातील अनेकांनी योगदान दिले. अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत परंतु या स्पर्धेबाबत फारशी जनजागृती झाली नव्हती. शाळा महाविद्यालय स्तरावर बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रे व्हावीत असा संघटनेचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्यातील हौशी क्रीडापटूंनी या संघटनेची सहभागी होऊन बॉक्सिंग खेळासाठी नव्या पिढीला मार्गदर्शन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कणकवली येथील चौंडेश्वरी मैदानावरील सभागृहांमध्ये स्पर्धेसाठी तयारी करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ही स्पर्धा सुरू होणार असून प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -