Wednesday, May 14, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

शिंदेनी सरकारला दिला जबरदस्त दणका, आठवलेंचे ट्वीट

शिंदेनी सरकारला दिला जबरदस्त दणका, आठवलेंचे ट्वीट

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आले आहे.


एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया उमटत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यावर ट्वीट करत शिवसेनेला डिवचले आहे.


https://twitter.com/RamdasAthawale/status/1539206288038457344

“एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही,” असे रामदास आठवले यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment