पुणे (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय योगा दिवस देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी योगा केला. उपस्थितांना योगाचे महत्व सांगितले.
संपूर्ण देशात योग दिन अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही योग दिन साजरा करण्यात आला. फुगेवाडी मेट्रो स्थानकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी योगा केला. यावेळी राणे म्हणाले, ‘योग दिवस साजरा करणे म्हणजे योगाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे, योगाचे फायदे, नियमित का करावा हे सांगणे होय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षापूर्वी योगदिन सुरु केला. योगाच्या माध्यमातून देशातील जनता निरोगी रहावी. त्यासाठीचा आवश्यक व्यायाम योगातून मिळतो. जनतेने व्यायाम करावा, निरोगी रहावे. आत्मनिर्भर भारत बनत असताना जनता निरोगी राहणे हे आवश्यक आहे. मेट्रो स्थानकावर योगा दिन साजरा होईल अशी कोणीही कल्पना केली नव्हती’.