पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांना आता अटक करण्यात आली आहे.
एका महिलेचा पती व करुणा शर्मा यांनी फिर्यादी महिला धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली होती आणि पतीसोबत घटस्फोट घ्यावा यासाठी ठार मारण्याची धमकी दिली होती. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आता करुणा शर्मा यांना अटक केली आहे.