Friday, May 9, 2025

महामुंबई

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस आणि मुंबई-गदग एक्स्प्रेसचे एकत्रीकरण

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस आणि मुंबई-गदग एक्स्प्रेसचे एकत्रीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे ट्रेन क्र. ११०२९/११०३० मुंबई- कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस आणि १११३९/१११४० मुंबई- गदग एक्स्प्रेस एकत्रिकरण केले जाणार आहे.


११०३० कोयना एक्स्प्रेस दि. २९.६.२०२२ पासून, ११०२९ कोयना एक्स्प्रेस दि. १.७.२०२२ पासून, १११३९ मुंबई-गदग एक्स्प्रेस दि. २९.६.२०२२ पासून, १११४० गदग-मुंबई एक्स्प्रेस दि. ३०.६.२०२२ पासून एकत्रिकरण केले जाणार आहे.


या गाड्यांची सुधारित संरचना एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, दोन वातानुकूलित चेअर कार, ४ शयनयान, एक सामान्य द्वितीय श्रेणी, ४ सामान्य द्वितीय आसन श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल. या गाड्यांच्या आरक्षणाकरीता ट्रेन क्र. ११०३०/११०२९ आणि १११३९च्या अतिरिक्त डब्यांसाठी बुकिंग दि. २२.६.२०२२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irct.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Comments
Add Comment