Friday, May 9, 2025

महाराष्ट्र

वीज कोसळून आईसह दोन मुलींचा मृत्यू

चंद्रपूर (हिं.स.) : चंद्रपूर तालुक्यातील वरवट येथे अंगणात काम करीत असलेल्या आईसह दोन मुलींचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली. अंगावर वीज कोसळल्याने या तिघींचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.


दुपारी चंद्रपूर तालुक्यातील वरवट येथे दुपारी अंगणात घरकामे करीत असलेल्या आईला कामात दोन मुली मदत करीत होत्या. त्यावेळी अचानक काही कळायच्या आत आई संगीता रामटेके (४२) सह रागिणी रामटेके (१७) व प्राजक्ता रामटेके (१५) या मुलींचा जागीच मृत्यू झाला.


याबाबतची माहिती दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. अंगावर वीज कोसळल्याने या तिघींचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment