Saturday, July 5, 2025

मुंबईत दिवसभरात १७८१ कोरोना रुग्ण

मुंबईत दिवसभरात १७८१ कोरोना रुग्ण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत मंगळवारी दिवसभरात १७८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर १७२३ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णसंख्या १४,१४६ पर्यंत पोहचली आहे. दिवसभरात एकाचा इतर आजारासह कोविडने मृत्यू झाला आहे. १७ रुग्ण सध्या ऑक्सिजन बेडवर आहेत.


गेले अनेक दिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून सध्या रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के आहे तर कोविड वाढीचा दर ०.०१८३ टक्के आहे. दरम्यान कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी कमी होत असून ३६९ दिवस एवढा झाला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment