Tuesday, October 8, 2024
Homeक्रीडामनप्रीत सिंगकडेच भारताच्या हॉकी संघाचे नेतृत्व

मनप्रीत सिंगकडेच भारताच्या हॉकी संघाचे नेतृत्व

कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाचे नेतृत्व करणाऱ्या मनप्रीत सिंगकडेच पुन्हा एकदा कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने ४१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. या संघात टोकियोतील कांस्यपदक विजेत्या संघातील ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तर चार खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. पीआर श्रीजेश, कृष्ण बहादूर थापा हे अनुभवी गोलरक्षक दुखापतीनंतर संघात परतले आहेत. संघाच्या बचाव, मिडफिल्ड आणि फॉरवर्डमध्ये अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. ड्रॅग फ्लिकर रुपिंदर पाल सिंगला या संघातून वगळण्यात आले आहे. ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगला संधी देण्यात आली आहे.

२८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाला इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना सोबत पूल ब मध्ये ठेवण्यात आले आहे. टीम इंडिया ३१ जुलैला घानाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये टीम इंडिया चौथ्या स्थानावर राहिली होती. भारताचा दुसरा सामना १ ऑगस्टला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. तिसरा सामना ३ ऑगस्टला कॅनडा विरुद्ध होणार आहे. तर भारताचा चौथा सामना ४ ऑगस्टला वेल्स विरुद्ध होणार आहे.

भारताचा संघ :

पीआर श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक (दोन्ही गोलरक्षक),
बचावपटू : वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, जर्मनप्रीत सिंग,
मिडफिल्डर: मनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, आकाशदीप सिंग, नीलकांत शर्मा,
फॉरवर्ड : मनदीप सिंग, गुरजंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -