श्रीराम मंदिर निर्मितीसाठी दान केलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स

अयोध्या : श्रीराम मंदिर निर्मितीसाठी दान केलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची खळबळजनक माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी मोजताना उघडकीस आली आहे.


रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजलेला नाही. काही जिल्ह्यानिहाय ऑडिटींगचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सध्या देशातून आलेल्या निधीची मोजणी सुरू आहे. यामध्ये रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला धक्कादायक अनुभव आला आहे. ट्रस्टच्या वतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे ५४५७.९४ कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास २२ कोटींच्या रक्कमेचे चेक बाऊन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. त्यातून हे चेक का वटले नाहीत याचा खुलासा होणार आहे.


काही तांत्रिक कारणांमुळे बाऊन्स झालेल्या चेकबाबत बँकेसोबत चर्चा करण्यात येणार आहे. सध्या मिळालेल्या वृत्तानुसार, कूपन, डिजीटल माध्यमातून आणि पावतींच्या माध्यमातून २२५३.९७ कोटींची निधी जमवण्यात आला आहे. एसबीआय-पीएनबी आणि बँक ऑफ बडोदामधील बचत खात्यात जवळपास ४५० कोटी रुपयांचा निधी जमला आहे. ट्रस्टने निधीसाठी दहा रुपये, शंभर रुपये आणि एक हजार रुपयांचे कूपन छापण्यात आले होते. या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेसाठी पावत्यांचा वापर करण्यात आला.


ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, १० रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून ३०.९९ कोटी रुपये, १०० रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून ३७२.४८ कोटी रुपये आणि एक हजार रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून २२५.४६ कोटी रुपये आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून १६२५.०४ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. अशा प्रकारे २२५३.९७ कोटींचा निधी जमवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय

'बिहारमध्ये घुसखोर नाही, स्थानिकच सरकार बनवतील!'

विकास आणि सुरक्षेसाठी 'एनडीए'ला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन पूर्णिया: "बिहारमध्ये घुसखोर सरकार बनवणार

डॉक्टर होता की कसाई, लॉकरमध्ये सापडली एके-४७ रायफल

श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला

भाजपला नवा अध्यक्ष मिळणार, राजनाथ सिंहांनी काय सांगितले?

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि