नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क मिळणार का याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. उच्च न्यायालयाने मागणी फेटाळल्यानंतर मलिक आणि देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची परवानगी फेटाळली आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानापासून वंचित राहिले आहेत.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळालेली नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
ठाकरे सरकारला आणखी "थप्पड" . सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख ची याचिका फेटाळली @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 20, 2022
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ठाकरे सरकारला आणखी “थप्पड”. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख ची याचिका फेटाळली, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.