Wednesday, July 3, 2024
Homeदेशयोग दिन कार्यक्रमांसाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीची निवड

योग दिन कार्यक्रमांसाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीची निवड

योग सोहळ्याचे नेतृत्व करणार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया

नवी दिल्ली : देश स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांसाठी ७५ प्रतिष्ठित स्थळांची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे त्यापैकीच एक. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, २१ जून २०२२२ रोजी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे योग सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या वर्षी, ‘मानवतेसाठी योग’ या संकल्पनेवर आधारित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारतात आणि जगभरात आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मन की बात कार्यक्रमात याची घोषणा केली होती.

आपल्या प्रतिष्ठित स्थळांचे प्रदर्शन घडवत ‘भारताची नाममुद्रा जागतिक स्तरावर’ यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम कॉमन योगा प्रोटोकॉल (सीवायपी) या ४५ मिनिटांच्या प्रोटोकॉलच्या सामंजस्यपूर्ण सामूहिक योग प्रात्यक्षिकावर आधारित आहे.

यावर्षी, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रमुख आकर्षण ‘गार्जियन रिंग’ असेल. याद्वारे जगभरात होत असलेल्या योग सोहळ्यांचा दिवसभर प्रसार केला जाईल. “द गार्जियन रिंग” “एक सूर्य, एक पृथ्वी” ही संकल्पना अधोरेखित करते आणि योगची एकत्रित शक्ती दर्शवते.

नियमितपणे योगाभ्यास करण्याच्या आरोग्यदायी सवयीला प्रोत्साहन देत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ट्विट केले. आजार टाळण्यासाठी आणि आनंद मिळविण्यासाठी, निरोगीपणावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने योगासने हा आपल्या जीवनाचा भाग बनवला पाहिजे असे त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -