Wednesday, May 7, 2025

कोकणमहत्वाची बातमीरत्नागिरी

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे सोमवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे सोमवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी (हिं. स.) : कोकण रेल्वेच्या मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण मार्च महिन्यात पूर्ण झाले आहे. रोहा ते ठोकूर दरम्यानच्या ७४० किलोमीटर लांबीच्या विद्युतीकरण झालेल्या कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन सोमवारी, दि. २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी पावणेतीन वाजता दृकश्राव्य माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.


उद्घाटन सोहळ्यानंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग प्रदूषणमक्त वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी रत्नागिरी, मडगाव तसेच उडुपी येथे इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवरील रेल्वे गाड्यांना रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. गेल्या २४ मार्च मार्च रोजी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून तपासणी करण्यात आली होती.


कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहून झेंडा दाखवत विद्युतीकरण झालेल्या मार्गाचा शुभारंभ करणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि उडुपी या तीन ठिकाणी यानिमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


विद्युतीकरणामुळे आता या मार्गावरील गाड्या डिझेलऐवजी विजेवर धावणार असल्याने वर्षाकाठी डिझेवर होणार्या खर्चात रेल्वेची सुमारे दीडशे कोटी रुपयांची बचत होणार आहे.

Comments
Add Comment