Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीदेवनार पशुवधगृहात प्रथमच ऑनलाइन परवानगी

देवनार पशुवधगृहात प्रथमच ऑनलाइन परवानगी

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची उपाययोजना

मुंबई (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वांत मोठे पशुवधगृह असणारे मुंबई महानगरपालिकेचे देवनार पशुवधगृह बकरी ईद सणानिमित्त सर्व सेवा-सुविधांसह सुसज्ज होत आहे. या पूर्वतयारीसह सेवा-सुविधांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी प्रथमच देवनार पशुवधगृहात म्हैसवर्गीय प्राणांच्या धार्मिक पशुवधासाठी ऑनलाइन पद्धतीने कत्तल वेळ आरक्षित करण्यासाठी सुविधा देण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, हे विचारात घेऊन ही उपाययोजना करण्यात येत आहे.

या बैठकीला महानगरपालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे, पोलीस, इतर संबंधित खाते प्रमुख तसेच देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण, अग्निशमन दल व वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बकरी ईदनिमित्त मुंबई पालिकेच्या देवनार पशुवधगृहात जिवंत बकरे व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या बाजारास परवानगी दिली जाते. यंदा हा सण १० जुलै २०२२ रोजी होणार आहे. यासाठी देवनार पशुवधगृहात २९ जून २०२२ सकाळी ६ वाजेपासून बकऱ्यांना व २८ जून २०२२ पासून म्हैसवर्गीय प्राण्यांना देवनार पशुवधगृहात प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान बकरे व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी स्थायी स्वरूपातील निवास क्षमतेसह अतिरिक्त तात्पुरते निवारे उभारण्यात येणार आहेत.

तसेच संपूर्ण परिसर हा सीसीटीव्हीच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ३६४ सीसीटीव्ही बसवणार आहेत. त्याचबरोबर प्राण्यांसाठी पाणी, चारा, प्राथमिक पशुवैद्यकीय आरोग्य केंद्रे यांची व्यवस्था करण्यात येत आहे. यावेळी नागरिकांच्या अडचणी सोडविणे व मदत करण्यासाठी २४ X ७ कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे.

देवनार पशुवधगृहात म्हैसवर्गीय प्राणांच्या धार्मिक पशुवधासाठी ऑनलाइन पद्धतीने कत्तल वेळ आरक्षित करण्यासाठी सुविधा प्रथमच देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. ही उपाययोजना कोविड प्रादुर्भाव होऊ नये, हे विचारात घेऊन करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -