नवी दिल्ली : आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, कर्नाटकातील म्हैसूर इथल्या, म्हैसूर पॅलेस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. या प्रदर्शनात योगचे सामर्थ्य, सर्वोत्तम सराव, संशोधनातील ठळक मुद्दे, योग नियम इत्यादींचाही समावेश असेल.
सर्वांनी यात सहभागी व्हावे आणि योगचा लाभ घ्यावा असे आवाहन करत पंतप्रधानांनी अनेक ट्विट सामायिक केले आहेत. गेल्या काही वर्षांत योग जागतिक स्तरावर खूप लोकप्रिय झाला आहे.
२१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता देण्यामागचा मुख्य उद्देश, जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्यामध्ये योगची क्षमता अधोरेखित करणे हा होता. डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेचा (यूएनजीए) आंतरराष्ट्रीय योग दिवस ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने मांडला गेला आणि एकमताने मंजूर करण्यात आला. २०१५ पासून, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा जगभरातील आरोग्यासाठीची मोठी चळवळच झाला आहे.
सध्या योगाभ्यासाचं महत्व अधिकच वाढलं आहे कारण, सद्य परिस्थितीत विशेषतः युवा वर्गात असंसर्गजन्य आणि जीवनशैलीशी निगडीत आजारांचं प्रमाण वाढलं आहे. तेव्हा चांगलं आरोग्य आणि कल्याणासाठी योगाभ्यास करत राहा.https://t.co/UESTuNybNm
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2022
सर्व स्तरातील आणि व्यवसायातील लोकांनी त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात त्याचा समावेश केला आहे. कारण योगमुळे त्यांना निरोगी जीवनशैली विकसित करण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी आपल्या ट्विट संदेशात नमूद केले आहे.