Monday, August 25, 2025

राज्यात ४००४ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण २३७४६ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात ४००४ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण २३७४६ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई हिं.स.) : राज्यात आज ४००४ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. आज रोजी एकूण २३७४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ३०८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ७७,६४,११७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८४ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१६,०३,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,३५,७४९ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Comments
Add Comment