Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

खरा शिवसैनिक कधीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान करणार नाही -मुनगंटीवार

खरा शिवसैनिक कधीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान करणार नाही -मुनगंटीवार

नागपूर : आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयासाठी विधानपरिषद निवडणूक लढवत आहोत. विचारपूर्वकच राज्यसभेत तीन उमेदवार दिले. आमदारांच्या सदसद्विवेकबुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. विधानपरिषदेचे आम्ही चमत्काराससाठी नाही तर पाचवा उमेदवार दिला नाही तर त्याचे नियोजनपूर्व आम्ही या निवडणुकीची तयारी केली आहे. भाजपचा पाचवाही उमेदवार निवडणून येईल, असा विश्वास भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते नागपुरात विभागीय भाजपकार्यलयात माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेचे आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असतील तर त्यांचे काही चुकले नाही. शिवसेनेच्या आमदाराना जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. शिवसेनेचा सर्व आमदारांना आवाहन आहे. त्यांनी १९६६ मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषण केले होते ते एकदा ऐकावे. ते एकदा ऐकले तर शिवसेनेचा खरा आमदार कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीवर प्रेम आहे जे बाळासाहेबांचे विचारांना विसरले असतील तेच मात्र मतदान करतील, असा टोलाही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला.

https://twitter.com/SMungantiwar/status/1538430730862473222

शिवाय आमदारांच्या सद्सद्विवेक बुद्धीला चोऱ्यामाऱ्या म्हणने, डॉक्टरपेक्षा कंपाउंडर मोठा म्हणने, पाप केल्याने कोरोना होतो असे म्हणने, भाजप जिंकली मात्र त्यांचा विजय झाला नाही असे म्हणने, या सर्वाबद्दल हजारो वर्षांच्या संशोधनानंतर उत्तर सापडतील अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली.

Comments
Add Comment