'अग्निवीरां'साठी निमलष्करी दलात १० टक्के कोटा

  102

नवी दिल्ली (हिं.स.) : अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात ४ वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी १० टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


अग्निवीरांना उपरोक्त दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा ३ वर्ष वयाची सूट दिली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे ५ वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल, असे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नव्याने भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती.


परंतु, गेली २ वर्षे भारतीय सैन्यात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे केंद्र सरकारने २०२२ साठी प्रस्तावित सैन्य भरतीसाठी वयामध्ये यंदा सूट देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार २०२२ अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे अशी करण्यात आलीय.


अग्निवीरांसाठी भरतीचे नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय थलसेना प्रमुख मनोज पांडे यांनी शुक्रवारी दिली आहे. '२०२२ मधील भरतीसाठी वयोमर्यादा २३ वर्ष करण्याचा सरकारचा निर्णय आम्हाला मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळातही जे भर्ती परीक्षेसाठी तयारी करत होते अशा तरूणांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.


ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पुढील २ दिवसांमध्ये http://joinindianarmy.nic.in नोटीफिकेशन जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर सेना भरतीबाबतचा विस्तृत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. डिसेंबर २०२२ पूर्वी अग्नीविरांची पहिल्या बॅचचं प्रशिक्षण सुरू होईल.' भारतीय सेनेत सहभागी होण्याची मोठी संधी यामधून प्राप्त झाली आहे, त्याचा फायदा घेण्याचे आवाहन सैन्य प्रमुखांनी केलेय.

Comments
Add Comment

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली