प्लॅटफॉर्म

डॉ. मिलिंद घारपुरे


ओटीटी प्लॅटफॉर्म (इच्छुकांनी फुलफॉर्म गुगल करावा).
बहुतांश वेळेला टीव्ही बघायला वेळ मिळतच नाही. चुकून मिळाला, तर रिमोट आई-बाबांच्या ताब्यात तरी
नाहीतर मुलाच्या. ‘सास भी कभी बहू थी’चे दिवस
जरी संपले असले तरी राजा राणी जोडी वगैरे तत्सम किंवा त्याहीपेक्षा टुकार निर्बुद्ध हास्य जत्रासारखे कार्यक्रम... चालूच!!!
...तर ईश कृपेने एका शुभ संध्याकाळी मला टीव्ही आणि त्याचा रिमोट प्राप्त जाहला. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, झी फाइव्ह, डिस्कवरी, सोनी लाइव्ह, डिस्ने हॉटस्टार... अरे बापरे!!! आता काय बघू???
सिरीयल, का ड्रामा, सस्पेन्स की थ्रिलर, पिक्चर, की एखादी डॉक्युमेंटरी? हे बघू का ते...? काही काही सीरियल खूपच मोठ्या, १०-१० सीजन, ४०-४० मिनिटाचा एक एक भाग. एवढे कधी बघणार...? अमुकचं रेटिंग खूपच कमी. तमुक छोटी पण स्टोरीलाईन खास नाही.
अर्धवट जेवत, समोरच जेवणाच ताट
चीवडत, हात वाळवत, ...धावतोय मी, रिमोट
हातात धरून एका ओटीटी प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर... पण हवी ती गाडी काही मिळालीच नाही... न जेवताच जेवण झालं!!!
थोडक्यात काय, काहीतरी हवं असतं माणसाला Entertain करणारं!!! काहीतरी नक्की....पण नक्की काय??? माहीत नाही.
अशी गोंधळलेली अवस्था असतानाssss, दहा ऑप्शनस समोर आले, तर निवडायचा गोंधळ अजूनच उडणारच. चुका होणार, वेळ जाणार.
असंच काहीसं होत असावं 'नव्या पिढीचं' या नवीन जगात काही निवडताना.!
करिअर, ध्येय, आयुष्याचे उद्दिष्ट, दैनंदिन खऱ्या खोट्या गरजा, लाइफ पार्टनर अशा असंख्य गोष्टीबाबत.
शिकायला हवं आणि शिकवायला हवं 'प्लॅटफॉर्म' निवडायला, हवी त्याच गाडीची वेळ
नक्की साधायला...

Comments
Add Comment

पाकव्याप्त काश्मीरमधील होरपळ

पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये अलीकडेच झालेल्या हिंसक चकमकीत तीन पोलीस अधिकाऱ्यांसह

याला जबाबदार कोण?

सध्याच्या परिस्थितीत बेस्ट उपक्रम हा व्हेंटिलेटरवर आहे. या बेस्ट उपक्रमात कार्यरत आणि सेवानिवृत्त मराठी सेवक

नोबेलचाही राहिला सन्मान

नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न ‘चकनाचूर’ झाले. नोबेल

हुमनॉइड व्योममित्र: एक क्रांतिकारी पाऊल

भारताने मानव उड्डाणक्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्धार केला असून त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘व्योममित्र’

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक समुपदेशन महत्त्वाचे

आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात, आपण अनेकदा आपल्या शारीरिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देतो. नियमित

भारताची मोदीप्रणीत हनुमान उडी

संपूर्ण भारतात दीपावलीचे दिवे प्रज्वलीत केले जात असताना, वर्तमानाशी सुसंगत रामायणातील एक कालातीत दृश्य आपल्या