Tuesday, October 8, 2024
Homeमहत्वाची बातमीमहाआघाडीतील असंतोष भाजपच्या पथ्यावर

महाआघाडीतील असंतोष भाजपच्या पथ्यावर

अपक्षांची नाराजी ‘मविआ’ला भोवणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये असंतोष व परस्परांवरील अविश्वास वाढीस लागल्याने ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. सोमवारी (२० जून) होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत फडणवीस यांनी अपक्ष आमदारांसह इतरही आमदारांशी संपर्क अभियान गतीमान केले आहे. महाआघाडीतील असंतोषामुळे व अंर्तगत कुरघोड्यांमुळे या निवडणूकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास फडणवीस व पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अडीच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघातील कामे न झाल्याने व संपर्क ठेवण्यात सत्ताधाऱ्यांनी उदासीनता दाखविल्याची नाराजी अपक्ष आमदारांकडून उघडपणे व्यक्त केली जात असल्याने महाआघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीतही भाजपने राज्यसभेप्रमाणे एक उमेदवार जास्त दिला आहे. त्यामुळे मविआची डोकेदुखी वाढली आहे. भाजपकडून पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनाही विधान परिषदेचे तिकीट मिळाले आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही मविआला पराभूत करण्यासाठी एक-एक अपक्ष आमदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपच्या नेते मंडळींनी कंबर कसली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जाणारे प्रसाद लाड यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. प्रसाद लाड यांचे सर्वपक्षीयांशी मधूर संबंध आहेत. त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही जवळचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे या निवडणुकीत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतात. काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यापुढे प्रसाद लाड यांचे कडवे आव्हान उभे राहीले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -