अप्पासाहेब देशमुखांना ईडीने केली अटक

सातारा : श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली. मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून ऍडमिशनसाठी पैसे गोळा केल्या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. पीएमएलए न्यायालयाने त्यांना २४ जून पर्यंत ईडीकडे कोठडी दिली आहे.


गेल्यावर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना अटक केली आहे.


https://twitter.com/dir_ed/status/1538097576569872384

अप्पासाहेब देशमुख हे डॉ. महादेव देशमुख यांचे सख्खे भाऊ आहेत. अप्पासाहेब रामचंद्र देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीच्या यादीतील हे पाच नंबरचे आरोपी आहेत.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे