
सातारा : श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली. मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून ऍडमिशनसाठी पैसे गोळा केल्या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. पीएमएलए न्यायालयाने त्यांना २४ जून पर्यंत ईडीकडे कोठडी दिली आहे.
गेल्यावर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना अटक केली आहे.
https://twitter.com/dir_ed/status/1538097576569872384अप्पासाहेब देशमुख हे डॉ. महादेव देशमुख यांचे सख्खे भाऊ आहेत. अप्पासाहेब रामचंद्र देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीच्या यादीतील हे पाच नंबरचे आरोपी आहेत.