Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कपिल देवच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळाला ३० वर्षे पूर्ण

कपिल देवच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळाला ३० वर्षे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १७५ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली होती. कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीला शनिवारी ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत.

भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला नमवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या विश्वचषकातील साखळी सामन्यात कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १७५ धावांची खेळी खेळली होती. कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीला शुक्रवारी ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत.

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात १८ जून रोजी टुनब्रिज वेल्स मैदानावर सामना खेळण्यात आला होता. हा सामना भारताने ३१ धावांनी जिंकला होता. भारताच्या या विजयात कर्णधार कपिल देव यांचे मोलाचे योगदान होते. या सामन्यात त्यांनी नाबाद १७५ धावांची खेळी खेळत क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु दुर्दैवाने भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कपिल यांची खेळी कॅमेऱ्यात कधीच रेकॉर्ड झाली नाही.

झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यांच्यानंतर मोहिंदर अमरनाथ (५ धावा), संदीप पाटील (१ धाव) आणि यशपाल शर्मा (९ धावा) यांनाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. या सामन्यात फक्त १७ धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता.

झिम्बाब्वेच्या केविन करन आणि पीटर रॉसन यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची दमछाक झाली. या सामन्यात भारतीय संघ ५० धावाही करू शकणार की नाही? असे वाटू लागले होते. परंतु, त्यानंतर मैदानात आलेल्या कपिल देवने संघाचा डाव सावरत १७५ धावांची ऐतिहासिक खेळी करत भारताची धावसंख्या २५० पार पोहचवली. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने झिम्बॉव्वेच्या संघाला २३५ धावांवर सर्वबाद केले.

Comments
Add Comment