Saturday, July 6, 2024
Homeक्रीडा३ देशांत होणार २०२६चा फिफा वर्ल्डकप

३ देशांत होणार २०२६चा फिफा वर्ल्डकप

न्यूयॉर्क : २०२६ साली होणाऱ्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजकपद ३ देशांना देण्यात आले आहे. वर्ल्डकपचे आयोजकपद तिघा देशांना देण्यात आल्याची फिफाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. २०२६ सालचा फुटबॉलवर्ल्डकप अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा येथे होणार आहे.

फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या फिफाने गुरुवारी रात्री जाहीर केले की, २०२६ साली होणारी वर्ल्डकप स्पर्धा १६ शहारांत पार पडले. या स्पर्धेत ३२ ऐवजी ४८ संघ असतील. २०२६ साली होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत ८० पैकी ६० सामने अमेरिकेत होणार आहेत. कॅनडा आणि मॅक्सिकोमध्ये प्रत्येकी १० सामने होतील. अमेरिकेच्या फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कार्लोस कोरडेरियो यांनी अमेरिकेच्या फुटबॉलसाठी ही एक मोठी घटना असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेत अँटलांटा, बोस्टन, डलास, ह्यूस्टन, कॅन्सास, लॉस एजिल्स, मियामी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रासिस्को, सिएटल येथे सामने होणार आहेत. मॅक्सिकोत गौडालाजारा, मॅक्सिको सिटी, मॉन्टेरी येथे, तर कॅनडात टोरंटो, वॅकूवर येथे सामने होतील. याआधी २० वर्षांपूर्वी म्हणजे २००२ साली जपान आणि दक्षिण कोरिया यांनी संयुक्तपणे वर्ल्डकपचे आयोजन केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -