नवी दिल्ली (हिं.स.) : देशातील कोरोनाच्या संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत १२ हजार ८४७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशात गुरुवारी दिवसभरात १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ७ हजार ९८५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत. एकीकडे सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स व्हायरसच्या धोक्यामुळेही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी ४ हजार २५५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी राज्यात ४०२४ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील २४ तासात २८७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्ताची संख्या ७७ लाख ५५ हजार १८३ इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८७ एवढे झाले आहे.