पालिकेच्या शाळा सुरू; पण विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकेच नाहीत

  111

मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पालिकेकडून २७ शालेय वस्तू देण्यात येतात. मात्र यंदा शाळा सुरू झाल्या असल्या तरी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय वस्तू मिळाल्या नसल्याची टिका आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. दरम्यान पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या "दप्तर" दिरंगाईचे उत्तर द्यावे अशी मागणी शेलार यांनी केली आहे.


दरवर्षी मुंबई महापालिकेकडून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रेनकोटसह विविध २७ वस्तू देण्यात येतात. मात्र यंदा निविदाच मंजूर न झाल्याने साहित्य पोहचायला आता ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता असून दप्तर सप्टेंबरमध्येच मिळेल असा कयास असल्याचे शेलार म्हणाले. तर दुसरीकडे महापालिका शाळा इंग्रजी माध्यमाच्या करून एकीकडे पब्लिक स्कूल नावाने आदित्य ठाकरेंची प्रसिद्धी सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र गरीब विद्यार्थ्यांना रेनकोट, पाटी, पेन्सिल, दप्तराशिवाय वर्गात बसावे लागत आहे. याचे दुर्दैव असल्याची टीकाही शेलार यांनी केली.


विशेष म्हणजे शाळा सुरू झाल्या त्याच आठवडाभरात हे साहित्य विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते. पण अद्याप निविदा मंजूर झालेली नाही आणि यामुळे विलंब होत आहे, की काही वाटाघाटी बाकी आहेत का? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी दप्तर, पेन, पेन्सिल शिवाय शाळेत जायचे का? असा देखील सवाल शेलार यांनी उपस्थित केला. दरम्यान येत्या सात दिवसांत जर हे साहित्य उपलब्ध झाले नाही तर विद्यार्थ्यांसाठी भाजप लढेल, असा इशारा आमदार आशिष शेलार यांनी दिला.

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक