Wednesday, July 2, 2025

राज्यात ४१६५ कोरोना रुग्णांचे निदान, २१७४९ ॲक्टिव्ह

राज्यात ४१६५ कोरोना रुग्णांचे निदान, २१७४९ ॲक्टिव्ह

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज ४१६५ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर तीन कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण २१७४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज ३०४७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,५८,२३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८६ टक्के एवढे झाले आहे.


सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१५,१७,३९९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,२७,८६२ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Comments
Add Comment