दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

  110

पुणे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये दहावी-बारावीची पुरवणी (फेर) परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा २१ जुलै, तर दहावीची परीक्षा २७ जुलै रोजी सुरू होईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.


राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ ते ८ ऑगस्टदरम्यान, तर बारावीची २० जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान आयोजित केली आहे. या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.


मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रकाची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येईल आणि ते वेळापत्रक अंतिम असेल. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १० जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० जूनपासून अर्ज भरता येणार आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने