हवाई दलाची भरती प्रक्रिया २४ जून पासून – व्ही.आर. चौधरी

  123

नवी दिल्ली (हिं.स.) : सैन्य दलातील ‘अग्निपथ’ या नव्या भरती योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. आगामी २४ जून पासून अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलाची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती एअर चिफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी शुक्रवारी दिली.


यासंदर्भात एअर चिफ मार्शल म्हणाले की, भारत सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत सशस्त्र दलात तरुणांची भरती केली जाऊ शकते. या योजनेत भरतीचे वय १७.५ वर्षे ते २१ वर्षे ठेवण्यात आले आहे. पहिल्या भरतीसाठी तरुणांची कमाल वयोमर्यादा २३ वर्षे करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने तरुण या भरतीसाठी अर्ज करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यासोबतच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षे करण्याच्या निर्णयामुळे सैन्यात भरती होण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना संधी मिळणार आहे. पण कोरोना साथरोगामुळे गेले २ वर्षे भरती योजना थांबवण्यात आली होती.


लष्करात भरतीसाठी वयात सवलत देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर लवकरच भरती प्रक्रिया जाहीर केली जाईल, असे जनरल पांडे यांनी सांगितले. लष्करप्रमुखांनी इच्छुक तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून सैन्यात भर्ती होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ‘भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.