मुंबई (प्रतिनिधी) : फेडरल रिझर्व्हकडून मोठी व्याजदरवाढ झाल्याने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे. व्याजदरवाढीची अपेक्षा या आधीच असल्याने सोमवारपासूनच शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू होते. गुरुवारी शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रापासून अस्थिरता दिसून आली. अखेर शेवटी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १०४५ अंकानी घसरून ५१,४९५ वर बंद झाला, तर निफ्टीतही ३३० अंकांची घसरण होत १५.३६० वर बंद झाला.
गुरुवारी सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ६०० अंकांच्या घसरणीसह ५३,१४१ वर सुरू झाला, तर निफ्टी १५५ अंकांच्या घसरणीसह १५,८४८ वर सुरू झाला. त्यानंतर थोड्याच वेळात शेअर बाजारात तेजी दिसून आली. मात्र फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ झाल्याने आज बाजारात अस्थिरता दिसून आली.