Saturday, July 5, 2025

दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर

दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या, शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल. मंडळाकडून २० जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते त्यानुसार १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.


महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या १७ जून रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.


दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत १७ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.


https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1537347204674748416
Comments
Add Comment