मुंबई (हिं.स.) : मध्य रेल्वे १४०टी रेल्वे क्रेन वापरून दादर स्थानकावर (किमी ८/१५-१६) फूट ओव्हर ब्रिज गर्डर्स लाँच करण्यासाठी माटुंगा आणि भायखळा दरम्यान रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे.
दि. १७/१८.६.२०२२ (शुक्रवार/शनिवार रात्री) रोजी ००.४० ते ०५.४० वाजेपर्यंत माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर वळवण्यात येतील आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील.
अप मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येतील
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणा-या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दोनदा थांबतील.
डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येतील
डाउन ट्रेन क्रमांक २२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवली जाईल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दादर येथे दोनदा थांबतील. दि. १८/१९.६.२०२२ रोजी (शनिवार/रविवार रात्री) ००.४० ते ०५.५० वाजेपर्यंत भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाउन
जलद मार्गावर ब्लॉक -२
डाउन मेल/एक्स्प्रेस ट्रेन वळवण्यात येतील गाडी क्रमांक १२०५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोनदा थांबतील.
डाउन उपनगरीय सेवा वळवण्यात येतील डाउन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील.