मुंबई (हिं.स.) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पडझडीनंतर गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झालीय. अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याज दरात वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारात दिसून आला.
बाजारात खरेदी वाढली असून सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला आहे. दरम्यान मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वधारले आहेत.
शेअर बाजारातील व्यवहाराला आज, गुरुवारी सुरुवात होताच, बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्सने ५३ हजाराचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सची सुरुवात ४७७.५२ अंकांच्या उसळणीसह झाला. एनएसई निर्देशांक निफ्टी १४०.१० अंकांनी वधारत १५८३२ अंकांवर खुला झाला.
आज शेअर बाजार खुला झाला तेव्हा सुरुवातीच्या काही मिनिटातच सेन्सेक्सने ५०० अंकांचा टप्पा ओलांडला. सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास सेन्सेक्स ५०३.७८ अंकांनी वधारत ५३,०४५.१७ अंकांवर व्यवहार करत होता.






